मुंबई

पालघरमध्ये महिलादिनी विविध कार्यक्रम

CD

पालघर, ता. ९ (बातमीदार) : पालघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त पालघर नगरपरिषद, जिल्हा परिषद, पोलिस कार्यालय आदी ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून महिलादिन साजरा करण्यात आला. सकाळी पालघर हुतात्मा चौक ते सोनोपंत दांडेकर मार्ग झुलेलाल मंदिरापर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुली तसेच महिलांचे कराटे प्रात्यक्षिक झाले. दुपारच्या सत्रात महिलांचे आजार यावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्ष डॉ. उज्ज्वला काळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुजा तरे, नगरसेविका प्रियांका म्हात्रे, राधा पामाळे, चेतना गायकवाड, अलका रजपूत, रोहिणी अंबुरे, हिंदवी पाटील यांच्यासह इतर नगरसेविका उपस्थित होत्या.
पालघर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेमध्ये रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा निमकर, बांधकाम व आरोग्य सभापती संदेश ढोणे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदही वाढान व जिल्हा परिषदेच्या सदस्य उपस्थित होत्या. पालघर पोलिस ठाणेअंतर्गत महिला पोलिस अधिकारी आणि महिला कर्मचारी यांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिरसाट यांनी गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT