मुंबई

पेण-खारेपाटला पाणीटंचाईच्या झळा

CD

पेण, ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील खारेपाट विभाग अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जात असून येथील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे खारेपाट भागाला पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची झळ अधिक सोसावी लागत असून या उन्हाळ्याच्या वातावरणात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्‍यातील वाशी, वढाव, भाल, काळेश्री, विठ्ठलवाडी, बोर्झे लाखोले, बहिराम कोटक, तामसीबंदर, तुकाराम वाडी, कान्होंबा या गावांसह येथील अनेक वाड्या पाणीटंचाईला दररोज सामोरे जात असल्याने या टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पेण पंचायत समिती प्रशासनाकडून अधिकृतपणे ६ टँकर उपलब्ध झाले आहेत. केवळ चार टॅंकर उपलब्ध झाल्याने या भागाला चार टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे उर्वरित २ टँकर येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
-------------------------------------------
कोट्यवधीचा आराखडा कागदावरच
सध्या उर्णोली, तुकारामवाडी या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पण दोन वर्षांपूर्वी या भागातील ५३ गावे व १२६ वाड्यांवर टॅंकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा आराखडा तयार करून या आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येत आहे.
---------------------------------------------------
पेण खारेपाट विभागाच्या पाणीपुरवठ्यासाठी सरकारने ३८ कोटी रुपयांचा निधी दिला. त्याला जवळपास ६ वर्षे पूर्ण झाली; मात्र तरीही पाणीपुरवठा सुरळीत नसून त्यामुळेच नागरिकांना पाण्याची झळ सोसावी लागत आहे.
- राजेंद्र झेमसे, सामाजिक कार्यकर्ते, वाशी
------------------------------------
पेण खारेपाट भागातील या गावासाठी शासनाच्या माध्यमातून अधिकृतपणे ६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आहे. खारेपाटातील उर्णोली आणि तुकारामवाडी येथे टॅंकर सुरू आहेत. उद्यापासून शिर्की भागात सर्व गावांना पाणीपुरवठा होईल.
- संजय कांबळे, पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती, पेण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT