मुंबई

मुलीच्या मृत्यूस कारणीभूत मद्यधुंद कारचालक अटकेत

CD

अंधेरी, ता. ९ (बातमीदार)ः वांद्रे येथे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटून ती दुसऱ्या एका कारसह रिक्षा आणि टेम्पोला जोरात धडकून झालेल्या अपघातात स्वाती चौधरी या तीनवर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ७) घडली होती. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारचालक विश्‍वास अत्तावर याला अटक केली. चौकशीत विश्‍वासने कार चालविताना मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे.

वांद्रे येथे राहणारा विनोद यादव (४६) गंगाराम कन्हेल यांच्याकडे चालक म्हणून कामाला आहे. मंगळवारी गंगाराम यांच्या सांगण्यावरून तो कार घेऊन त्यांच्या घराच्या दिशेने जात असताना त्याचा मित्र ओम चौधरी (२५) आणि त्याची पुतणी स्वाती तिथे उभे असल्याचे दिसले. त्याने दोघांना कारमध्ये बसविले होते. ते सर्वजण वांद्रे खेरवाडी येथे आले असताना समोरून येणाऱ्या‍ एका कारने त्यांना जोरात धडक दिली. त्यात विनोदसह ओम आणि त्याची पुतणी गंभीर जखमी झाले. या कारने अन्य एका रिक्षा आणि टेम्पोलाही धडक दिली होती. या अपघातात विनोद आणि ओम किरकोळ जखमी झाले; तर स्वातीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, विश्वासला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT