मुंबई

कुर्ला, चांदिवली परिसरात दोन नवीन उद्याने

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : कुर्ला आणि चांदिवली परिसरातील नागरिकांना येत्या वर्षभरात दोन नवीन उद्याने मिळणार आहेत. यातील एक उद्यान चांदिवली संघर्षनगर येथे, तर दुसरे उद्यान कुर्ला स्थानकाजवळ विकसित करण्यात येणार आहे. या दोन्ही उद्यानांसाठी प्रशासनाने निविदा मागवून कंत्राटदाराची नियुक्तीही केली आहे. यासाठी पाच कोटी ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या वर्षभरात या मैदानांचा विकास केला जाणार आहे.

चांदिवली संघर्ष नगरमधील दोन एकर जागेवर उद्यान साकारण्यात येणार आहे. हा भूखंड विकास आराखड्यात मैदानासाठी आरक्षित करण्यात आला होता. त्यानुसार आता अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. कुर्ला स्थानकाजवळ पश्चिम दिशेला एस. जी. बर्वे मार्गावर असलेल्या गांधी मैदानाचाही विकास करण्यात येणार आहे. ३५ हजार चौरस मीटर जागेवरील या मैदानात सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. कुर्ला स्थानकाला लागून असलेल्या बेस्ट बस आगाराच्या मागे ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित होती. जागेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने येथे अतिक्रमण झाले होते. येथील नागरिकांनी गांधी मैदानावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला. प्रशासनाकड़ून आता या मैदानाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

खेळांचीही व्यवस्था
दोन्ही उद्यानांच्या सुशोभीकरणासोबतच पदपथ, संरक्षक भिंत, संरक्षक जाळ्या, बैठक व्यवस्था, पर्जन्य जलवाहिन्यांची सुविधा दिली जाणार आहे. तसेच क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, मल्लखांब, कुस्ती अशा खेळांसाठीची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छतागृहे तयार करण्यात येणार असून, दिव्यांची रोषणाई, कचरापेटी लावणे, हिरवळीची कामे देखील करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT