मुंबई

राज्यातील १०० बसस्थानकांचे नुतनीकरण

CD

मुंबई, ता. १० ः अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील १०० बसस्थानकांचे नूतनीकरण, दर्जावाढ आणि डागडुजी करण्यासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडून बसस्थानकांच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली.
एसटी महामंडळाची राज्यभरात सुमारे ५८० बस स्थानके असून त्यापैकी २२७ बसस्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने नूतनीकरण, दर्जावाढ तसेच पुनर्बांधणी करण्यात येत आहे. त्यातील ४९ बसस्थानके नव्याने प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. एसटी महामंडळ प्रत्येक तिकिटामागे १७.५ टक्के रक्कम प्रवासी कराच्या रूपाने राज्य शासनाला देते. १७.५ टक्क्यांपैकी १० टक्के रक्कम राज्य शासन भांडवली अंशदान एसटीला भांडवली खर्चासाठी देते. त्यातून एसटी बसस्थानकांच्या पुनर्विकासाची कामे केली जातात. २०१५ ते २०२२ या कालावधीत बसस्थानकांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून ५२० कोटी रुपयांचा निधी एसटी महामंडळाला मिळाला. या निधीतून ४९ बसस्थानके बांधून पूर्ण झाली; परंतु कोरोना आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अन्य बसस्थानकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे वर्ष २०२२-२३ मध्ये आणखी ९७ बसस्थानकांच्या पुनर्विकासास शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
---
चेहरामोहरा बदलणार
पूर्वीच्या रखडलेल्या १३० आणि नव्याने मंजुरी मिळालेल्या ९७ अशा एकूण २२७ बसस्थानकांच्या पुनर्विकासासाठी एसटी महामंडळाने सुमारे ९८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यापैकी १०० बसस्थानकांचे नूतनीकरण, दर्जावाढ आणि डागडुजीच्या ४०० कोटींच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT