मुंबई

सलोखा योजनेअंतर्गत शुल्क आकारणीमध्ये सवलत

CD

पालघर, ता. १२ (बातमीदार) : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचे सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्कात सवलत योजना ३ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णयाद्वारे शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील आपापसांतील वाद मिटवण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण व्हावा व एकमेकांतील सौख्य, शांतता व सौहार्द वाढीस लागण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीनधारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये व नोंदणी शुल्क एक हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्यासाठी सलोखा योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गावातील तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT