मुंबई

केडीएमटी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा

CD

कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन मजदूर युनियनच्या वतीने १६ मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिली. नादुरुस्त बस वापरण्याचा दबाव केडीएमटी प्रशासन कर्मचाऱ्यांवर टाकत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
केडीएमटीच्या ताफ्यात नादुरुस्त बसची संख्या वाढली आहे. या बस दुरुस्त करण्यात याव्यात, या मागणीसाठी प्रशासनाला वारंवार पत्र पाठवण्यात आले आहे, परंतु प्रशासनाकडून याकडे दर्लक्ष करण्यात आले, असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या नादुरुस्त बसमुळे कर्मचारी आणि प्रवासी दोन्हींच्या जीवाला धोका होऊ शकतो, पण अशा बस वापरात आणण्यासाठी प्रशासन कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहे. याविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. १६ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता केडीएमटी गणेश घाट डेपो ते कल्याण आरटीओ कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT