मुंबई

अंबरनाथ गोळीबार प्रकरणातील १६ जणांचा जामीन अर्ज फेटाळला

CD

ठाणे, ता. १३ (वार्ताहर) : अंबरनाथमधील अंदाधुंद गोळीबार प्रकरणातील १६ संशयित आरोपींचा जामीनअर्ज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. अमित शेटे यांनी फेटाळला.

अंबरनाथमध्ये बैलगाडा शर्यतीच्या वादातून १३ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके आणि कल्याणचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांच्यात वाद होऊन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणात ३२ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पंढरीनाथ फडके आणि माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचाही समावेश आहे. यात अटक १६ आरोपींनी ठाणे सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला होता. याप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. अमित शेटे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू होती. अटकेतील आरोपी हे जामिनासाठी पात्र नसल्याचे विशेष सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांनी न्यायालयाला सांगितले. विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. शेटे यांनी जमीन अर्ज फेटाळताना या प्रकरणात कपिल वाधवान खटल्याचा संदर्भ दिला. तोच अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या प्रक्रियेनुसार कायद्याची अंमलबजावणी करण्याचे स्वातंत्र्य दिले. पहिल्या दिवसापासून तपास योग्यरीत्या होत असल्यामुळे अर्जदारांना जामीन देता येत नाही, असे सांगत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT