मुंबई

व्हिडीओप्रकरणी युवासेना पदाधिकारी ताब्यात

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी युवासेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. आज सकाळी साईनाथ मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हायरल व्हिडीओप्रकरणी शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी रविवारी (ता. १२) रात्री विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. तसेच दहिसर पोलिसांनी रविवारी अशोक मिश्रा व मानस कुवर या दोघांनाही अटक केली. म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर आता साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे.

साईनाथ आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय?
साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याची चर्चा आहे. साईनाथ युवासेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. ‘मातोश्री’ फेसबुक पेजवरून शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता पोलिस चौकशीत साईनाथ दुर्गे काय जबाब नोंदवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. साईनाथ दुर्गे हे सध्या दहिसर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

व्हिडीओमुळे वडिलांची बदनामी : राज सुर्वे
प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांनी सोमवारी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. राजकीय हेतूने माझ्या वडिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचदृष्टीने मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. राजकीय वैमनस्यातून हा सगळा प्रकार सुरू आहे. संबंधित आरोपींविरोधात लवकरात लवकर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी राज सुर्वे यांनी केली.

एसआयटीमार्फत चौकशी
कथित मॉर्फ केलेल्या व्हिडीओच्या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकार विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त करणार असल्याचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सोमवारी सांगितले. विधानभवनात आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देताना राज्यमंत्री देसाई यांनी या प्रकरणात उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल अशी माहिती पटलावर दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT