मुंबई

मुंबई- गोवा महामार्गावरील चोरी प्रकरणी सहा आरोपींना अटक

CD

पेण, ता. १४ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील पेणजवळील आंबिवली फाट्यानजीक काल (ता. १३) पहाटेच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी दापोलीवरून मुंबईकडे जाणाऱ्या एका कुटुंबियांच्या गाडीवर दगड मारून त्यांची गाडी अडवून त्यांच्याबरोबर झटापट करीत त्यांच्याकडील जवळपास १५ तोळे सोने लुटण्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी आरोपी सुरेंद्र भगवानराम बिश्नोई (वय २१), पूनमचंद किसन बिश्नोई (वय २३), कुणाल दिलीप देवरे (वय २४), प्रभाकर हरी उलवेकर (वय ४३) श्रीचन्द किसनराम बिश्नोई (वय ३१), शामसुंदर भगीरथराम बिश्नोई (वय २९) यांना अटक केली असून यातील प्रभाकर हरी उलवेकर याची अचानक तब्येत बिघडल्याने त्याला उपचारांकरिता पेण येथील म्हात्रे हॉस्पिटल येथे दाखल केले होते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT