मुंबई

कोपरीत विकासकामांमध्ये गैरव्यवहार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे दर्जाहीन झाली आहेत. या कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केळकर यांनी मंगळवारी (ता.१४) विधानसभेत केली. कोपरी परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येतो. त्यामुळे आमदार केळकर यांनी आरोप केल्याने याची चर्चा रंगू लागली आहे.

मागील वर्षी महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपल्याने येथे प्रशासकीय राजवट लागू झाली. त्यातच ठाणे जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. अशातच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे पूर्व येथील कोपरी परिसरात ठाणे पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे ही दर्जाहीन झाली असून यामध्ये आर्थिक गैर व्यवहार झाले असल्याचा आरोप मंगळवारी केला. तसेच, या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री ठाण्याच्या विकासासाठी भरपूर निधी आणत आहेत. मात्र, विकासाच्या नावाखाली ठराविक ठेकेदार आणि अधिकारी या निधीची लूट करत असल्याचा गंभीर आरोपही केळकर यांनी केला.
-------
दर्जाहीन कामे
कोपरी परिसरात जाॅगिंग ट्रॅकसाठी ९८ लाख, पदपथ सुधारणा प्रकल्पालासाठी ५ कोटी ४४ लाख आणि इतर अनेक कामांसाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण, यातील अनेक कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आली आहेत, असा आरोप केळकर यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT