मुंबई

पनवेल शहरातून रिक्षासह मोटारसायकलची चोरी

CD

रिक्षासह मोटरसायकलची पनवेलमधून चोरी
नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेल शहरातून एका रिक्षासह मोटरसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक कल्पेश जगे यांनी त्यांची रिक्षा लाईनआळी येथील श्री दत्त रायगडसमोरील रोडवर दिगंबर अपार्टमेंटमध्ये पार्क करून ठेवली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने त्यांची रिक्षा चोरून नेली; तर दुसऱ्या घटनेत गॅरेजचालक मुकेश प्रजापती यांची शिवाजी नगर झोपडपट्टी येथील सार्वजनिक शौचालयासमोरील दुचाकीदेखील चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
-------------------------------
लाखोच्या मालासह चालक फरार
नवीन पनवेल (वार्ताहर) : पनवेलमधील लॉजिस्टिक कंपनीमधून २८ लाखांचा माल घेऊन टेम्पोचालक फरार झाल्याची घटना आहे. याप्रकरणी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाने चालकाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक उपेंद्र साळवी यांनी पनवेल कोळखे येथील सीसीआय लॉजिस्टिक लिमिटेड कंपनी येथून माल घेऊन येण्याचे काम टेम्पोचालक जितेश कुशवाह याच्याकडे दिले होते. मात्र, गाडीमध्ये लोड केलेला २४ लाख ४२ हजार ८६३ रुपये किमतीचे मुद्देमाल घेऊन आरोपी फरार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT