मुंबई

मेट्रो च्या कामात शाहिदाच्या चौकाचे फलक गायब

CD

हुतात्म्यांच्या चौकाचा फलक
मेट्रोच्या कामात गायब
मालाड, ता. १६ (बातमीदार) ः मालाड चिंचोली बंदर-लिंक रोड परिसरात असलेला भरत बुद्धाजी मेस्त्री चौकचा फलक मेट्रोच्या कामात हरवल्याची तक्रार एका जागरूक रहिवाशाने पालिकेकडे केली आहे. स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक अशोक पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई पालिकेने हुतात्मा भरत मेस्त्री चौकाचे नामकरण करून फलक लावून उद्‍घाटन केले होते.
२००० मध्ये सोनसाखळी चोरांना पकडण्याच्या प्रयत्नात सामाजिक कार्यकर्ते भरत मेस्त्री यांना प्राण गमवावे लागले होते. एका सोनसाखळी चोराने शस्त्राने वार केल्याने मेस्त्री यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक अशोक पटेल यांच्या पुढाकाराने हुतात्मा भरत बुद्धाजी मेस्त्री चौकाचे उद्‍घाटन करण्यात आले होते. तत्कालीन भाजप नगरसेविका, गोरेगावचे आमदार विद्या जयप्रकाश ठाकूर आणि भरत मेस्त्री यांच्या आईही तेव्हा उपस्थित होत्या. मात्र सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या खोदकामात फलक हरवला आहे. रहिवासी
प्रशांत केळुस्कर यांनी त्याबाबत पालिकेत तक्रार केली आहे.

फोटो ओळ
गोरेगाव ः आरे कॉलनी युनिट क्रमांक १६ परिसरातील कचऱ्याच्या ढिगात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या फेकल्या जात आहेत. परिणामी मोकाट गायी आणि प्राण्यांना धोका पोहचत आहे. कचऱ्यातील अन्न खाताना प्लास्टिकच्या पिशव्याही त्यांच्या पोटात जात आहेत. कचरा नियमित उचलला जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी वाढली असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. (छायाचित्र ः दिनेश तर्फे)

मुलुंडचा संतोष बंगेरा ‘छत्रपती श्री’
मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः करी रोडमधील श्री छत्रपती शिवाजी व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत यंग दत्ताराम हेल्थ क्लबमधील संतोष बंगेरा याने बाजी मारली. ‘छत्रपती श्री २०२३’ पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईतील तब्बल १०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. संतोषला रोख रक्कम, मानाचा पट्टा आणि चषक देऊन गौरविण्यात आले. संतोषने आपल्या यशाचे श्रेय त्याच्या संजीवनी जिम मुलुंडचे प्रशिक्षक आणि छत्रपती पुरस्कार व ‘भारत श्री’ विजेते वसंत सालियन यांना दिले. संतोषची ‘भारत श्री’साठी निवड झाली असून सध्या तो त्यासाठी जय्यत तयारी करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT