मुंबई

मुंबईत फॅमिली फिजिशियनचा तुटवडा : अँड आशिष शेलार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबईची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असताना स्थानिक विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या केवळ १०० जागा उपलब्ध होतात, त्यामुळे मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात फॅमिली फिजिशियन उपलब्ध होत नाहीत, याकडे भाजप आमदार ॲड. आशीष शेलार यांनी विधानसभेत लक्ष वेधले.

विधानसभेत अर्थसंकल्पाची खातेनिहाय चर्चा सुरू असून या चर्चेत सहभागी होताना आमदार आशीष शेलार यांनी मुंबईतील या गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत जनरल फिजिशियनची संख्या अपुरी असल्याचे उघड झाले आहे. या सर्वेक्षणानुसार मुंबईतील एकूण ७०० एमबीबीएस जागांपैकी ६०० जागा गुणवत्तेनुसार, तर केवळ १०० जागा स्थानिक विद्यार्थ्यांना मिळतात. त्यातील ६० विद्यार्थीच मुंबईत प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देतात. नवी दिल्लीची लोकसंख्या अडीच कोटी असताना स्थानिक विद्यार्थ्यांना ८०० जागा मिळतात, चेन्नईची लोकसंख्या १ कोटी तिथे ३०० जागा, कलकत्ता येथे दीड कोटी लोकसंख्येसाठी ४०० जागा, तर मुंबईची लोकसंख्या अडीच कोटी असताना केवळ १०० जागा उपलब्ध होतात. त्यामुळे त्याचे परिणाम आरोग्य सेवेवर होतात, गुणवत्ता हा निकष असायलाच हवा, संपूर्ण देशातील विद्यार्थी कुठेही शिकू शकतो, पण याबाबत मुंबईत असलेली विषमता दूर करण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती शेलार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT