मुंबई

आनंदाची गुढी गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सजली

CD

जुईनगर, ता. २१ (बातमीदार)ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला चैत्र महिन्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गुढीपाडवा म्हटले की सर्वत्र उत्साह, आनंदाचा संचार असतो. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या बाजारपेठांमध्ये पंचांग, साखरगाठी, रेशीम वस्त्र, कडुलिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या, फुलांच्या माळा, रांगोळी, पताका आणि गुढीसाठी लागणाऱ्या बांबूची काठी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग आहे.
गुढीपाडव्यानिमित्त खरेदीसाठी बाजारात नागरिकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या बाजारपेठा सजल्या आहेत. या दिवसासाठी सर्वत्रच उत्साहाचे वातावरण असते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या स्वागताची जोरदार तयारी पहायला मिळत आहे. त्यामुळे गुढी उभारण्यासाठी लागणारे पंचांग, साखेरच्या गाठ्या, रेशीमवस्त्र, तांबा, पितळ अथवा काशाचा गडू, रांगोळी, पताका, गुढीसाठी बांबूची काठी अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.
-----------------------------------------
बाजारात रेडीमेड गुढीला पसंती
नवी मुंबईमधील वाशीतील एपीएमसी मार्केटसह सानपाडा जुईनगर नेरूळसह इतर ठिकाणी या गुढ्या विक्रीसाठी आलेल्या असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्लास्टिकच्या छोट्या गुढ्या १५० रुपयांपासून; तर मोठ्या गुढ्यांची किंमत ३०० रुपयांच्या पुढे आहे. यंदा चिनी बनावटीच्या गुढ्याही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणाऱ्यांकडे अनेकांचा कल आहे.
-------------------------------------------
साखरेच्या गाठींना मान
गुडीपाडव्याला साखरेच्या गाठीचा मान असतो. त्यामुळे गाठी खरेदी आवर्जून केली जाते. मात्र, यंदा साखरेचे भाव वाढल्यामुळे साखर गाठीचे भाव वाढले आहेत. २० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत साखर गाठी उपलब्ध आहेत. बाजारात विविध रंगाच्या साखर गाठी उपलब्ध असून केसरी, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगांमुळे आकर्षक सवलती देऊन दुकाने, मॉलमध्ये विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नात आहेत.
-----------------------------------------
नऊवारी साडी विशेष आकर्षण
गुढीपाडव्यानिमित्त नऊवारी साडीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे नऊवारी साडीवर शोभणारा साजशृंगार करण्याकडे महिला आणि चिमुरड्या मुलींसह तरुणींचा वाढता कल आहे. नऊवारी साडीमध्ये काष्ठी ब्राम्हणी, पेशवाई अशा वेगवेगळ्या आकर्षक रंगांच्या साड्या उपलब्ध आहेत. त्यात ब्राम्हणी आणि पेशवाई साड्यांना अधिक मागणी मिळत आहे.
--------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT