मुंबई

कर बुडव्यांच्या दारांसमोर ढोल

CD

तुर्भे, ता.२०(बातमीदार): नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील काही मालमत्ताधारक कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे बड्या मालमत्ता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून त्यांना प्रवृत्त केले जाणार आहे. तसेच कर भरला नाहीतर नळ जोडणी खंडित केली जात आहे.
नवी मुंबई महापालिकेला मालमत्ताकर हा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. नवी मुंबई महापालिकेने यंदा मालमत्ता कर वसुलीचे ५७५ कोटीचे लक्ष ठेवले असून आत्तापर्यंत ४५० कोटी आत्तापर्यंत वसूल केले आहे. मात्र, तरी देखील नवी मुंबई शहरात आजही मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराची थकबाकी आहे. कोरोना काळात ही थकबाकी अधिक झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीत नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने पालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. मात्र, अभय योजना लागू करून देखील काही थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अशा मोठ्या रक्कमेची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. अशा मालमत्ता धारकांना पालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. मात्र, तरी देखील कर भरण्यास दिरंगाई होत असल्याने महापालिका थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वाजवणार आहे.
------------------------------------
‘फुल स्टॉप’मॉलवर कारवाई
नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ताकर विभागातर्फे मालमत्ता कर वसुलीसाठी कारवाईला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने सानपाडा सेक्टर १९ मधील चर्चिल फुल स्टॉप मॉलमधील १५ गाळ्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, १५ पैकी ३ गाळेधारकांनी मालमत्ता कराची ५० लाखांची रक्कम भरणा केली आहे. तर ४ गाळे धारकांवरील कारवाईवर न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे उर्वरित ८ गाळे धारकांवर रीतसर कारवाई करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

World Asthama Day 2024 : तुमचं वाढलेलं वजन दम्याला अधिकच गंभीर बनवते, हे खरंय का?

SCROLL FOR NEXT