मुंबई

मालमत्ता कर वसुलीसाठी नोटिसा

CD

नवीन पनवेल, ता. २१ (वार्ताहर)ः सिडको हद्दीतील मालमत्ता कर थकवलेल्या १,३९८ मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील कर थकवलेल्या १०० मालमत्ताधारकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर थेट वसुलीची कारवाई केली जाणार आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुमारे १०० उद्योजकांना मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पनवेल महापालिकेने नोटिसा दिल्या आहेत; तर एमआयडीसीमधील एकूण १० हजार २५ मालमत्ताधारकांपैकी अधिक मालमत्ता कर थकवलेल्या १०० मालमत्ताधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यावसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरू केली आहे. या वसुलीसाठी महापालिकेच्या वतीने ८ टीम केल्या आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या टीम सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात आहे.
---------------------------
कर भरण्यासाठी संकेतस्थळ
मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा दोन टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर मालमत्ता कर भरता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT