मुंबई

पालघरमध्ये जागतिक जलदिन साजरा

CD

पालघर, ता. २२ (बातमीदार) : जल जीवन मिशन योजनेचे काम पुर्ण झालेल्या आणि घराघरांत शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होत असलेल्या गावांनी हर घर जल, तसेच हागणदारी मुक्त अशी अधिकृत घोषणा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी दिले आहेत. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो, यानिमित्त २२ मार्च रोजी ग्रामसभा घेवून गावांनी ठराव मंजूर करून घेण्याच्या सूचना केंद्रीय पेयजल स्वच्छता विभाग, जल शक्ती व पंचायत राज मंत्रालयाच्या सचिवांनी दिलेल्या आहेत. जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना तसेच शाळा, अंगणवाडी , सार्वजनिक संस्थाना नळ जोडणीद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित होत आहे, अशा गावांनी ग्रामसभेत हा ठराव घ्यायचा आहे. तसेच जल संधारण करण्याबाबत चर्चाकरून जल शपथ घेण्यात येणार आहे. गावातील सर्व कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या निकषांची पूर्तता केलेल्या गावांनी ओडीएफ प्लस ठराव घेवून तशी घोषणा करावी. ग्रामसभा घेऊन ही प्रक्रीया पार पाडावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आणि जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT