मुंबई

जोड रस्त्याचे काम रखडले

CD

मनोर, ता. २३ (बातमीदार) : टेन गावातील दफनभूमी जोडरस्त्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून बंद पडले आहे. सध्याच्या स्थितीत रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. टेन गावातील दफनभूमीत जोडरस्त्यावरील खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मार्चअखेरपर्यंत काम पूर्ण झाले नाही, तर निधी माघारी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याआधी दफनभूमी जोड रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्यास अंत्यसंस्कार आणि शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्याने पोलिस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
टेन गावातून दफनभूमीकडे जाणाऱ्या अडीचशे मीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने मुस्लिम वस्तीमधील मयत व्यक्तींच्या अंत्ययात्रेदरम्यान ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने दफनभूमीच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दफनभूमी रस्त्याच्या मजबुती करणासाठी चोवीस लाखांचा निधी उपलब्ध झाला होता. रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध होऊन निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सरपंच सदू गणेशकर यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. नोव्हेंबर महिन्यात ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू करून मोरीचे बांधकाम झाल्यानंतर रस्त्याच्या कामात आडकाठी केल्याने रस्त्याचे काम बंद पडले आहे.
दफनभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी अनेक वर्षांनंतर निधी उपलब्ध झाला होता; परंतु गावाबाहेरच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने गट नंबर ३९ च्या जागेवर मालकी हक्क सांगत रस्त्याचे काम अडवल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोर वाडा रस्त्यापासून टेन गाव आणि दफनभूमीपर्यंतचा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे गाव रस्ता क्रमांक ११८ म्हणून नोंद आहे. दफनभूमी जोडरस्त्याचे थांबलेले काम सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागाचे अभियंते पोलिस बंदोबस्त मागवण्याच्या तयारीत होते. पण अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही.
....
असा आहे प्रकल्प
टेन गावाच्या दफनभूमीपर्यंतच्या २४३ मीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी ग्रामविकास विभागाकडून २४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. या निधीतून टेन गावापासून दफनभूमी पर्यंतच्या ३२५ मीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण केले जाणार आहे. यात ८० मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण, २४३ मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण, ७२ मीटर लांबीचे गटार आणि एका मोरीचे बांधकाम प्रस्तावित आहे; पण आता विरोध असलेल्या ठिकाणच्या रस्त्याचे काम सोडून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी पंढरी पाटील यांनी दिली.
....
टेन गावातील दफनभूमी जोडरस्त्याच्या अंदाजपत्रकाप्रमाणे आणि नियोजित लांबीच्या रस्त्याचे काम झाले पाहिजे. रस्त्याच्या अर्धवट कामाला आमचा विरोध आहे.
- जबी राऊत, ग्रामस्थ, टेन
....
दफनभूमी जोडरस्त्याच्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाला विरोध आहे; परंतु ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत नसल्याने काम सुरू झालेले नाही. विरोध असलेला भाग सोडून उपलब्ध जागेवर काम केले जाईल.
- संजय कुलकर्णी, उपविभागीय अभियंता, पंचायत समिती, पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT