मुंबई

शाळांत सेमी इंग्रजी माध्यम सुरू करा

CD

अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेच्या १६ शाळांमध्ये इंग्रजी विषय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली. विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी करण्यात आली. अंबरनाथ नगरपरिषदेच्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविण्यास (सेमी इंग्रजी) परवानगी देण्यात यावी, असे मागणीत नमूद करण्यात आले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या मालकीच्या १६ प्राथमिक शाळा असून त्यामध्ये १,५४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अंबरनाथ शहरामध्ये शासकीय मालकीच्या शाळांमध्ये अद्यापपर्यंत इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध नसल्याने शहरातील विद्यार्थ्यांचा ओढा खाजगी शाळांमध्ये वाढत चालला आहे. त्याकरिता शहरामध्ये नगरपरिषद मालकीच्या १६ शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याची आवश्यकता आहे. याबाबतचा ठराव नगरपरिषदेने केला असून शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्याकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला असल्याचे आमदार डॉ. किणीकर यांनी निदर्शनाला आणून दिले.

----------------------
पालिका शाळांमध्ये इंग्रजी विषय शिकवण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रधान सचिवांना याबाबत सूचित करण्यात आल्याने या प्रस्तावावरील कार्यवाहीला वेग मिळाला आहे.
- डॉ. बालाजी किणीकर, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT