मुंबई

एक लाख नागरिकांनी क्षयरोग तपासणी

CD

अलिबाग, ता. २३ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचा विळखा वाढू नये, यासाठी क्षयरोग विभाग सक्रिय आहे. बाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी क्षयरोग विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात २०२० ते २०२२ या तीन वर्षांत एक लाख सात हजार ९३९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ११ हजार ६४६ नागरिकांना क्षयरोगाची लक्षणे दिसून आले. या रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यांना पोषण आहारासाठी निक्षय पोषण योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील क्षय रुग्ण शोध मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाते. जिल्ह्यात १६ पथके कार्यरत आहेत. त्यामध्ये पनवेल महापालिका व पनवेल तालुक्यातील वावंजे ग्राम पातळीवर प्रत्येकी एक असे दोन पथक आहेत. जिल्ह्यात ६२ सूक्ष्मदर्शी केंद्र आहेत. केंद्राच्या माध्यमातून संशयित रुग्णांच्या थुंकीचे नमुने घेणे, एक्सरे काढणे अशा अनेक प्रकारची कामे केली जातात. जिल्ह्यात वीस वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक असून ११ वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आहेत. यांच्यामार्फत रुग्णांवर वेळेवर उपचार करणे. त्यांची तपासणी करणे, बाधित रुग्णांना वेळोवेळी गोळ्या वाटप करून दर पंधरा दिवसांनी त्‍यांची विचारपूस करणे आदी कामे केली जातात. यात अंगणवाडी सेविका व आशा वर्करचा सहभाग मोलाचा आहे. क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रुग्णांना पोषण आहार नियमीत मिळावा, यासाठी केंद्र सरकारने निक्षय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला रुग्णांना पाचशे रुपयांचे अनुदान दिले जाते. तीन वर्षात जिल्ह्यातील ११ हजार ६४६ रुग्णांना मदतीचा हात दिल्‍याची माहिती क्षयरोग कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

प्रभारी अधिकाऱ्यांकडे कारभार
क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची तपासणी करणे, रुग्ण शोधणे, त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे, अशी कामे या यंत्रणेमार्फत केली जातात. क्षयरोग विभागात जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे पद नऊ महिन्यांपासून रिक्त आहे. डॉ. देवकर सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ अधिकाऱ्याचे पद न भरल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर तळा येथील डॉ. वंदनकुमार पाटील यांच्याकडे जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून सप्टेंबरपासून कारभार सोपविण्यात आला आहे. अनेक वर्षापासून एक वैद्यकीय अधिकारी, चार प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदे रिक्त आहे. ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ यांनी केली आहे.

जिल्‍ह्यातील क्षयरुग्‍णांचा आढावा
वर्ष - रुग्‍ण तपासणी - निदान - बरे झालेले - उपचाराधीन - मृत्यू
२०२० - १९८२४ - ३३८५ - २९०३- ०००० - १५८
२०२१- ३०२७१- ४२०१ - ३४३० - ०००० - १७६
२०२२- ५७८४४ - ४०६०- १६०९ - २३१५- १३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT