मुंबई

उल्हासनगर आयुक्तांकडून १० क्षयरुग्ण दत्तक

CD

उल्हासनगर (बातमीदार) : जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने उल्हासनगर पालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात आयुक्त अजीज शेख यांनी १० क्षयरुग्णांना दत्तक घेतले. या रुग्णांना महिनाभर पुरण्याएवढा पोषण आहार देण्यात येणार आहे. महापालिकेच्या सभागृहात क्षयरुग्णांसाठी पोषण आहाराचे योगदान देणाऱ्या आणि यासाठी लोकसहभाग वाढवावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या निक्षय मित्रांचा सत्कार समारंभ आज (ता. २४) आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, निक्षय मित्र ॲड. मनीष वाधवा, राजीव भाटिया, डॉ. सुषमा तोमर, डॉ. राजू उत्तमानी, राजेश साधवानी आदी उपस्थित होते. उल्हासनगरात १,३५० क्षयरुग्ण असून ५३ निक्षय मित्र हे ४०० रुग्णांना दर महिन्याला पोषण आहार देतात. आयुक्त शेख यांनी दत्तक घेतलेल्या रुग्णांना प्रत्येकी तीन किलो गहू, तांदूळ, तेल, शेंगदाणे असा महिनाभरापुरता पोषण आहार दिला जाणार आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिता सपकाळे, क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. रत्नमाला नांदगाये यांनीही काही रुग्ण दत्तक घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT