मुंबई

आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाचे उद्‌घाटन

CD

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : उल्हासनगरात आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राचे आमदार असून, त्यांच्या हद्दीत उल्हासनगरातील नऊ वॉर्ड येतात. येथील नागरिकांना काही नागरी समस्या भेडसावल्यास त्यांना आमदार गायकवाड यांच्या कल्याण पूर्वेतील कार्यालयास जावे लागत होते. ही वस्तुस्थिती असल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार मराठा सेक्शनमध्ये जनसंपर्क कार्यालय तयार करण्यात आले असून, त्याचे उद्‌घाटन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या वेळी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, भाजपचे प्रवक्ता प्रदीप रामचंदानी, माजी नगरसेवक शेरी लुंड, मंडळ अध्यक्ष नीलेश बोबडे, पदाधिकारी रेश्मा नवले-बोबडे, सुनील तांबेकर, माजी नगरसेविका इंदिरा तरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT