मुंबई

अतिक्रमण कारवाईविरोधात भाजपचा मोर्चा

CD

डहाणू, ता. २७ (बातमीदार) : डहाणू नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होताच बेकायदा बांधकामाविरोधात नगर परिषदेने कारवाई सुरू केली होती. शिवाजीनगर येथील आठ ते दहा घरे, तसेच पारनाका येथील अतिक्रमणे तोडण्यात आली. तसेच डहाणू शहरातील ३०० कुटुंबांना घरे तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही मोहीम त्वरित थांबवण्यात यावी, या मागणीसाठी माजी नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (ता. २७) नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चातील शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी वैभव आवारे यांना निवेदन सादर करण्यात आले. नगर परिषदेने चालू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन आवारे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SCROLL FOR NEXT