मुंबई

खर्डी क्रीडासंकुलासाठी जागाच नाही

CD

खर्डी, ता. २८ (बातमीदार) : खर्डीतील प्रस्तावित क्रीडा संकुलासाठी जागा मंजूर झालेली आहे; परंतु ही जागा अतिक्रमणात गेल्याने क्रीडा संकुल कागदावरच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर ठिकाणी क्रीडा संकुल बनवण्याचा प्रस्ताव बनवावा, अशी मागणी खर्डी विभागातील क्रीडा संघटना व मंडळे करीत आहेत.

खर्डी येथे क्रीडा संकुलासाठी जागा मंजूर झाली होती; पण, तिथे अतिक्रमण करून घरकुले बांधण्यात आलेली आहेत. अतिक्रमण केलेली घरकुले शासकीय नियमानुसार कायम करायची असल्याने या ठिकाणी क्रीडा संकुल होणे शक्य नाही. त्यामुळे हे संकुल कागदावरच राहील, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. महसूल विभागाने इतर शासकीय जागेत क्रीडा संकुल बनवण्यासाठी प्रस्ताव बनवावा, अशी मागणी खर्डी विभागातील क्रीडा संघटना व मंडळांनी केली आहे. या क्रीडासंकुलाचा उपयोग तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळण्यासाठी होणार आहे. जर हे क्रीडा संकुल झाले नाही, तर या खेळांडूंना वंचित राहावे लागेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

आताचे मुख्यमंत्री व ठाण्याचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ वर्षांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात आयोजित करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना खर्डी येथील क्रीडा संकुलासाठी ७ एकर जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते; परंतु याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष केल्याने दिवसेंदिवस येथे अतिक्रमणे वाढली. त्यामुळे क्रीडा संकुलासाठी लागणारी ७ एकर जमीन येथे उपलब्धच होत नाही, असे अधिकाऱ्यांकडून समजत आहे. सध्या येथील १५ घरकुलांची जमीन नियमित करण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून उर्वरित ३५० च्या वर सुद्धा नियम अटी लागू करून नियमित करण्यात येण्याचा प्रस्ताव शासनदरबारी आहे.
------------
खर्डी येथे क्रीडा संकुलसाठी मंजूर झालेल्या ठिकाणी जागाच उरली नाही. क्रीडा संकुलसाठी नवीन प्रस्ताव तयार करून इतरत्र असलेल्या शासकीय जमिनीवर शासनाने क्रीडा संकुलाचे काम सुरू करावे.
- अश्पाक मेमन, कर्णधार, जय महाराष्ट्र क्रिकेट मंडळ, खर्डी
---------
खर्डीतील क्रीडा संकुलाच्या मंजूर जागेवर अतिक्रमित घरकुले असल्याने ती घरकुले शासन निर्णयानुसार कायम करायची आहेत. त्यासाठी क्रीडा संकुलसाठी उर्वरित जमीन मोजणीच्या सर्व्हेसाठी भूमिअभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला असून मोजणी झाल्यावर नेमकी तिथे किती जमीन उपलब्ध होईल ते कळेल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- अमित सानप, उपविभागीय अधिकारी, भिवंडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT