मुंबई

पेण-खोपोली रस्त्यावरील अपघातात दोघांचा मृत्यू

CD

पेण, ता. २८ (वार्ताहर) : पेण-खोपोली रस्त्यावरील पेण सावरसई व गागोदे गावाजवळील खिंडीत झालेल्या दोन वेगवेगळ्या वाहनांच्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली.
यातील पहिला अपघात हा गागोदे गावाजवळ झाला असून मोटरसायकल चालक अजय पेटारे (वय ३५, रा. झिराडपाडा, अलिबाग) व मनोज पाटील (वय ३८, रा. कमळपाडा शहाबाज) हे दोघे मोटर सायकल घेऊन पेण-खोपोली रस्त्यावरून खोपोलीकडे जात असताना टेम्पोशी धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील मनोज पाटील हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरा अपघात सावरसई गावाजवळ होऊन यातील संदीप शिर्के (वय ३१, रा. पाडले, ता. पेण) हा स्कुटीवरून खोपोली बाजूकडून पेणच्या दिशेने येत असताना कारचालकाने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चुकीच्या दिशेने येत मोटरसायकलला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार संदीप शिर्के जागीच मरण पावल्याची घटना घडली. या अपघातांप्रकरणी पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT