मुंबई

पालघर जिल्हा राज्यात पाचवा

CD

पालघर, २८ (बातमीदार) ः या वर्षीच्या विविध आरोग्य निर्देशांकांमध्ये पालघर जिल्ह्याने राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र, पुणे, महाराष्ट्रमार्फत आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी, शल्यचिकित्सक तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या आरोग्य संस्थांमार्फत विविध आरोग्य कार्यक्रम राबवले जातात. या कार्यक्रमांचे निर्देशांक दरवर्षी जाहीर केले जातात. यात पालघर पाचवा क्रमांक मिळवण्यात यशस्वी झाले आहे.

माता-बाल आरोग्य व कुटुंब कल्याण, किशोरवयीन स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, असंसर्गजन्य आजार, गुणवत्ता आश्वासन, आरोग्यवर्धिनी कार्यक्रम, आशा, राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील विविध कार्यक्रम, जन्ममृत्यू नोंदणी प्रणाली इत्यादीमधील कामानुसार गुणांकन करण्यात आले. एकूण प्राप्त गुणांनुसार गुणांकन करण्यात आले. आरोग्य विभागाद्वारे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांचे अहवाल सादरीकरण हे राज्य व केंद्र सरकारच्या विविध पोर्टलमार्फत केले जाते. याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले आहे. तसेच येत्या काळात पालघर जिल्हा प्रथम क्रमांकावर येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा आरोग्य डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मान
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही देशातील नामांकित संस्था असून याद्वारे आरोग्यविषयक धोरणांसाठी विविध संशोधने राबवली जातात. डहाणूतील एम. आर. एच. आर. यू. या संस्थेमार्फत पालघर जिल्ह्यातील आरोग्य समस्यांना प्राधान्य देऊन ही संस्था विविध संशोधन प्रकल्प राबवत आहे. सिकलसेल, ॲनिमिया, सर्पदंश, जन्मजात व्यंग, गर्भाशयमुख कर्करोग इत्यादी आजारांवर जिल्हा परिषदेमार्फत या संस्थेने आरोग्य संशोधन केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सहअन्वेषक म्हणून या संशोधनात जबाबदारी पार पाडली असून संस्थेने सूर्यवंशी व पालघर जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांना सन्मानित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT