मुंबई

प्रतिज्ञापत्रातही माहिती लपवली

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली आहे. कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रातदेखील खोटी माहिती दिली. धनंजय मुंडे यांचे नाव मी सगळ्या कागदपत्रांत लावते. १९९८ पासून आम्ही एकत्र असून २००४ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो, असे आरोप करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.
‘मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत, याची कागदपत्रे देईन. मी कायद्यानुसार कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे,’ असे म्हणत त्यांनी मुंडे यांच्यावर आज आणखी आरोप केले. ‘माझ्या एक कोटी रुपयांच्या पॉलिसीमध्येदेखील धनंजय मुंडे हे नॉमिनी आहेत. माझ्या पासपोर्टमध्ये, माझ्या मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावर आणि आधार कार्डवरदेखील त्यांचे नाव आहे. त्यांच्या स्वतःच्या दोन कोटी रुपयांच्या पॉलिसीवरदेखील माझे नाव बायको म्हणून आहे. मी त्यावर नॉमिनी आहे. आमचे दोघांचे बँकेत जोडखातेदेखील आहे.’
...
शरद पवारांकडे मागणी
‘पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसेच इतर अनेक कागदपत्रांवर माझे नाव करुणा धनंजय मुंडे असेच आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिस आणि प्रशासन माझा छळ करत आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
...
१५ लाख रुपये घेतले!
‘मला सोशल मीडियावर घाणेरडी शिवीगाळ केली जाते. लोकांकडून मला शिव्या घातल्या जातात. २००१ मध्ये माझे दागिने आणि घर विकून हृदयात छिद्र आहे, असे सांगून माझ्याकडून १५ लाख रुपये घेतले,’ असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT