मुंबई

रस्त्यावर राडारोडा टाकणारे १० डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात

CD

नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : उरण रस्त्यालगत सिडकोच्या मोकळ्या जागेत राडारोडा टाकणारे १० डम्पर शुक्रवारी (ता. ३१) पहाटे जप्त करण्यात आले आहेत. परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्तांच्या अधिपत्याखालील पथकाने केलेल्या कारवाईत पोलिसांनी १० डम्परचालकांना ताब्यात घेतले. या डम्पर चालकांविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

उलवे भागातील वहाळ येथील साई मंदिरासमोरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या जागेत काही व्यक्ती रेबीट, माती आणि दगड टाकत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शुक्रवारी पहाटे प्रत्यक्ष जागेवर जाऊन शहानिशा केली असता, १० डम्परमधून राडारोडा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी डेब्रिजने भरलेले १० डम्पर आणि चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल गरड आणि त्यांच्या पथकाने केली.

उरणमध्ये मुंबईतील डेब्रिज
मुंबईतील राडारोडा उरण रस्त्यालगत आणून डम्परचालक टाकत असल्याचे चौकशीत आढळून आले. डम्पर चालकांना मुबारक, शकील, माऊली, अमित खारकर, विकी दापोलकर यांनी राडारोडा उरण रस्त्यालगत वहाळ, जांभूळपाडा व इतर मोकळ्या जागेत टाकण्यासाठी सांगितल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT