मुंबई

तळोजा भोपाळच्या वाटेवर

CD

खारघर, ता.६ (बातमीदार): तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबत मुंबईत लोकाआयुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. या प्रदुषणामुळे स्थानिक त्रस्त आहेत, पण कंपन्यांकडून प्रदुषणावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने भविष्यात भोपाळ औद्योगिक क्षेत्रातील वायू गळतीच्या घटनेची पुनरावृत्ती तळोज्यात होण्याची भीती लोकआयुक्तांनी व्यक्त केली आहे. तसेच सहा आठवड्यात प्रदुषणावर नियंत्रण मिळवले नाहीतर अशा कंपन्या कायमस्वरूपी बंद करण्याची तंबीच दिली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत नऊशेहून अधिक कारखाने आहेत. यात राज्यातील सर्वाधिक केमिकल कंपन्या तळोजा औद्योगिक वसाहत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच तळोजा एमआयडीसीमधील या रसायन निर्मितीच्या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण सुरू आहे. त्यामुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातून येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासाने तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावातील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तळोजामधील आदर्श सामाजिक संस्थेने मुंबईतील लोकायुक्तांकडे याबाबतची तक्रार केली आहे. याबाबतची सुनावणी बुधवारी (ता.५) घेण्यात आली. यावेळी या सुनावणी दरम्यान प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी देखील आपली बाजू मांडली आहे. तसेच युक्तिवाद करताना औद्योगिक वसाहत निर्माण होण्यापूर्वीपासून काही गावे आहेत. त्यांच्या तक्रारी नव्हत्या, पण शहरीकरणामुळे तक्रारी वाढू लागल्याचा दावा केला आहे. तसेच काही आर्थिक हितासाठी तक्रारी करत असल्याचे म्हंटले आहे. त्यावर संताप व्यक्त करताना लोकआयुक्तांनी तक्रार करणारे नागरिक आपला वेळ फुकट घालवेल का, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला आहे. तसेच भोपाळ औद्योगिक क्षेत्रात घडलेल्या वायु गळतीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती करावयाची आहे का ? असा प्रतिप्रश्नच कंपन्याना उपस्थित केला आहे.
-------------------------------
कंपन्यांवर दुर्लक्षाचा ठपका
सुनावणीच्या वेळी प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रातून समुद्र आणि खाडीत सोडणाऱ्या गॅस वाहिन्यांचे काही ठिकाणी वायू गळती होत असून याकडे औद्योगिक कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याचे समजले.
-------------------------------------
औद्योगिक कंपन्यांमधून सोडल्या जाणाऱ्या घातक वायूमुळे खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे या वसाहतीमधील रहिवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे तळोजा औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणकारी कंपन्यांचे स्थलांतर मुंबई परिसरात करण्यात यावे.
-राजीव सिन्हा, अध्यक्ष, आदर्श सामाजिक संस्था
------------------------------------
तळोजा औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत लोक आयुक्तांना माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या आदेशाप्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठीच्या ठोस उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.
-सचिन आडकर, विभागीय अधिकारी, प्रदूषण महामंडळ विभाग, तळोजा
-------------------------------------
तळोजा वसाहतीत आठ दहा कंपन्या वायू प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असतील. अशा कंपन्यांवर प्रदूषण महामंडळाने नक्कीच कारवाई करावी.
-सुरेश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रिअल असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'तीन टप्प्यांनंतर हे स्पष्ट झालंय की भाजपचा विजय रथ जनता पुढे नेतेय..' - पंतप्रधान मोदी

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT