मुंबई

वाड्यात संविधानाचे वाटप

CD

वाडा, ता. १५ (बातमीदार) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाडा येथे सिद्धार्थ मित्र मंडळाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. शुक्रवारी बाबासाहेबांना सामूहिक वंदन करण्यात आले. त्यानंतर सेवा निवृत्तिवेतन व महिलांसाठी डॉ. बाबासाहेबांचे योगदान या विषयावर नवनाथ शिंदे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कुडूस पोलिस दूरक्षेत्रासमोर बाबासाहेबांच्या प्रतिमेला निवासी नायब तहसीलदार सुनील लहांगे, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, विजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. या वेळी रामदास जाधव, डी. जी. भोईर, रमेश भोईर, इरफान सुसे, सचिन जाधव, स्वप्नील जाधव, आनंद भोईर, नितीन जाधव, नरेंद्र मोरे आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते. बोधीवृक्ष छाया मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT