मुंबई

स्थानक परिसरात फेरीवाल्यांचे अतिक्रमण थांबवा

CD

कोपरखैरणे, ता. २२ (बातमीदार) ः फेरीवाल्यांनी कोपरखैरणे रेल्वेस्थानक आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ बस्तान बसवले आहे. रेल्वे सुरक्षा विभाग आणि पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवसांनी पुन्हा ते तिथे परततात. यासाठी वेळोवेळी आंदलन करूनही प्रशासन लक्ष देत नाही, अशी तक्रार प्रवासी संघटनेने केली आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे हे अतिक्रमण थांबवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

पालिका व रेल्वे विभाग वेळोवेळी फेरीवाल्यांवर कारवाई करतात. तरीही पुन्हा पुन्हा फेरीवाले का परततात. यावर ठोस उपाययोजना का होत नाही, असा सवाल सुरेश शिंदे या प्रवाशाने केला आहे; तर सुनीता जगताप म्हणाल्या, की भिकारी, गर्दुल्ले हे महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणत असताना याप्रकरणी कायमस्वरूपी उपाय का होत नाहीत? राजकीय पक्षांच्या महिला नेत्या याकडे लक्ष देत नाहीत. स्टेशनबाहेर व स्टेशनमधील स्थिती सारखीच आहे. बाहेर यांच्यामुळे वाहतूक कोंडी होते, तर आतमध्ये बसायला असणाऱ्या बाकड्यांवरही यांनीच अतिक्रमण केले आहे. याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देत प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Election : केंद्र–राज्य सरकारच्या निधीतून इचलकरंजीचा सर्वांगीण विकास आमदार राहुल आवाडे

World Archery Championship: साताऱ्याच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड; जागतिक तिरंदाजी स्पर्धा; साहिल, ओजस, मधुरा, आदितीचा समावेश!

IND vs NZ 2nd ODI : विराट कोहलीचं सातत्य, वाढवतंय रोहित शर्माचं टेंशन! आज असं काही घडल्यास, बसेल 'हिटमॅन'च्या साम्राज्याला धक्का

Ichalkaranji Election : इचलकरंजीचा पाणीप्रश्न कायमचा मिटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, चंद्रकांत पाटीलांचा दावा

Latest Marathi News Live Update : नांदेड महानगरपालिकेसाठी उद्या मतदान, 81 जागेसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT