मुंबई

न्यू होराईझन स्कूल विरोधात मनविसेचे आंदोलन

CD

वाशी, ता. २२ (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर १३ येथील न्यू होराईझन स्कॉलर्स स्कूल अँण्ड नियो किड्स शाळेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शुक्रवारी (ता.२१) आंदोलन केले. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थी सेनेकडून शाळेविरोधात निदर्शने तसेच घोषणाबाजी करण्यात आली.

न्यू होराईझन स्कूलच्या व्यवस्थापनाने अचानक १५ टक्के फी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे उशिरा शुल्क भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दिवसाला १०० रुपये दंडआकारणी सुरू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उशिरा शुल्क भरले आहे त्या विद्यार्थ्यांना शालेय प्रशासन वर्गाबाहेर बसवत आहे. याबाबतची तक्रार पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे केली होती. आधीच महागाईने त्रस्त झालेल्या पालकांना शालेय व्यवस्थापन कोंडीत पकडत असल्याने मनविसेने आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात मनसे उपशहर अध्यक्ष नीलेश बाणखेले, सहसचिव नितीन लष्कर, दिघा विभाग अध्यक्ष भूषण आगिवले, विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष दशरथ सुरावसे व योगेश शेटे, सचिव निखिल थोरात, सहसचिव श्रीधर रणपिसे आणि स्वप्नील जोशी, गणेश भोसले तसेच मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत सुरू होणार मोठं मिशन; भारतात का येतेय ही अवकाश गुप्तचर कंपनी? छोट्या उपग्रहांची मोठी तयारी

IND vs SL 2nd Test: भन्नाट,भन्नाटssss! यशस्वी जैस्वालचा हा कॅप पाहाच, श्रीलंकेच्या ओपनरला झोप लागली नसेल Video Viral

Devendra Fadnavis: महिला आरक्षण २०३४ पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न; विरोधक महिलांना आरक्षणापासून रोखताहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

Marathi News Live Updates : 1 सप्टेंबरला मुंबईत धडकणार ओबीसी मोर्चा; नेत्यांकडून गावोगावी भेटी देत प्रचारसभा

Raju Shetty: देशात ४८ लाख टन साखर गायब; २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप, प्रतिटन ५ हजार रुपये द्यावेत

SCROLL FOR NEXT