मुंबई

सन्मान महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा

CD

सन्मान महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा
शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात रंगणार पुरस्कार सोहळा
मुंबई, ता. २४ : विवेकाची, विचारांची आणि समृद्ध कलेची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्र राज्याला आहे. जितका भाविक तितकाच कणखर, जितका उदार तितकाच कर्तृत्ववान, असा हा महाराष्ट्र प्रदेश. अनेकांच्या योगदानातून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या तुम्हा-आम्हा सर्वांना अपरंपार आनंद देऊन महाराष्ट्राची ओळख आपल्या कार्यकर्तृत्वाने अधिक ठसठशीत करणाऱ्या काही मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी (ता. २९) वांद्रे -कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
‘अर्थ’ या संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
आपल्या कार्यकर्तृत्वातून आणि कष्टातून ज्यांनी महाराष्ट्राचे नाव गाजवले अशा महाराष्ट्राच्या असामान्य धुरिणींचा आणि संस्थांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. तसेच मुंबईच्या विकासात मोलाचा योगदान असलेला मुंबईतील कोळी समाज, मुंबई मनपाचे सफाई कर्मचारी, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, मुंबई डबेवाला संघटना इत्यादींचासुद्धा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ या कार्यक्रमात होणार आहे. राजकारणापासून तंत्रज्ञानापर्यंत, व्यवसायापासून कलेपर्यंत अनेक प्रकारच्या क्षेत्रांत महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या कष्टाने आणि उपजत गुणांनी संधीचे सोने करत महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या, कर्तृत्वगुणांची दखल घेणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२३’ हा सोहळा महाराष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांप्रती ऋण व्यक्त करण्याचा आनंद सोहळा आहे. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची झलक अनुभवायला मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा सोहळा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
--
प्रवेश विनामूल्य
सोहळ्याचे आयोजन करणारी ‘अर्थ’ ही संस्था २०१९ पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकनॉमिक अँड सोशल कौन्सिलची ‘विशेष सल्लागार’ ही मान्यताप्राप्त असलेली संस्था आहे. ही संस्था सामाजिक आणि आर्थिक सुधारणांना उत्प्रेरित करण्यासाठी कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT