मुंबई

एशियाटिकमधील खजिना खुला होणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : एशियाटिक सोसायटीने दीडशे वर्षांपासून जपून ठेवलेला प्राचीन आणि दुर्मिळ नकाशांचा खजिना सामान्य मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. एशियाटिक आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मेपासून एशियाटिकमध्ये या प्राचीन नकाशांचे प्रदर्शन सुरू होणार आहे.
सोसायटीने १३०० पेक्षा जास्त नकाशांचा संग्रह जतन करून ठेवला आहे. मुंबईतील ताडदेव, कामाठीपुरा, ग्रँट रोड, गिरगाव, उमरखाडी, माझगाव आणि भायखळ्याचे जुने नकाशे येथे बघता येणार आहेत. हे प्रदर्शन ५ मे ते ४ जूनपर्यंत एशियाटिक सोसायटीच्या दरबार ह़ॉलमध्ये सुरू राहणार आहे. ईस्ट इंडिया कंपनीने १८०२ मध्ये संपूर्ण भारतीय उपखंडाचे अचूक सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले. या मोहिमेला ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे असे म्हटले जाते. ही मोहीम पूर्ण होण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी लागला. यादरम्यान संपूर्ण उपखंडाची मोजणी आणि नकाशे तयार झाले. हा संपूर्ण वैभवशाली इतिहास या प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडून दाखवला जाणार आहे. ब्रिटिशांनी हे सर्वेक्षण केले असले, तरी त्यात अनेक भारतीयांनी मोलाची भूमिका निभावली. या मोहिमेदरम्यानचे अनेक सर्व्हे, नकाशे एशियाटिक सोसायटीकडे आहे. हे सर्व नकाशे या प्रदर्शनात ठेवले जाणार असल्याची माहिती एशियाटिक सोसायटीने दिली.
...
दुर्मिळ नकाशे
एशियाटिक सोसायटीकडे ऐतिहासिक आणि भौगौलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या १३०० नकाशांचा संग्रह आहे. यातील बहुतांश नकाशे हे १९ व्या शतकातील आहेत, तर उर्वरित १८ आणि २० व्या शतकातील आहेत. यातील अनेक नकाशे हे जिऑग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेच्या मालकीचे होते. १८७३ मध्ये ही संस्था एशियाटिक सोसायटीमध्ये विलीन झाली आणि या नकाशांचा संग्रह एशियाटिककडे आला. देशातील विविध प्रांत, राज्याचे हे नकाशे आहेत; मात्र त्यातील बहुतांश हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे आहेत. मरीन सर्व्हे, सर्व्हेअर जनरल ऑफिस, नॅशनल जिऑग्राफिकल सोसायटी, जिटी सर्व्हे ऑफिसने हे नकाशे बनवले होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या राज्यांच्या काही नकाशांचा या संग्रहात समावेश आहे. हे नकाशे अमेरिकन जिऑलॉजिकल सर्व्हेने तयार केले होते.
....
अन्यत्र कुठेही उपलब्ध नसलेले ऐतिहासिक संदर्भ असलेले नकाशे या प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत. हे प्रदर्शन म्हणजे भारताच्या सर्व्हेचा वैभवशाली इतिहास आहे. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह सर्वांनी आवर्जून हजेरी लावावी. महिनाभर चालणाऱ्या या प्रदर्शनीत अनेक नामवंत व्याख्याते, वर्कशॉप क्युरेटरर्सचे मार्गदर्शनही मिळणार आहे.
- शहेरनाज नलवाला, उपाध्यक्ष, एशियाटिक सोसायटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT