मुंबई

अनधिकृत बांधकाम तोडण्यास विरोध

CD

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण, डोंबिवली शहरात अनधिकृत बांधकामाचे पेव फुटले असून अनेक वेळा ग्राहकांची फसवणूकही झाल्याचे उघड झाले आहे. महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र त्याला माफियांकडून विरोध होत असल्याचे दिसत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीमध्ये ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते यांनी शहराच्या पश्चिम परिसरातील कुंभार खान पाडा येथील होली क्रॉस स्कूलसमोरील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. बांधकामधारक मनोज म्हात्रे, मंदार म्हात्रे, मयूर म्हात्रे यांच्या सहा मजली इमारतीच्या बांधकामाचे स्लॅब निष्कासित करण्याची कारवाई मंगळवारी (ता. २५) दिवसभरात केली. या कारवाईवेळी बांधकामधारकांनी महापालिकेची यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता इमारतीच्याकडे जाण्याच्या रस्त्यात वाहने उभी करून अडथळा निर्माण केला होता. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस विभागामार्फत अडथळा दूर करण्याची कारवाई करण्यात आली. त्यानंतर महापालिकेकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या बांधकामधारकांवर यापूर्वीच एम.आर.टी.पी. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई
महापालिकेच्या परिसरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. २७ फेब्रुवारी ते २३ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये पालिका हद्दीत १,४०० अतिक्रमणे झाल्याची पालिकेच्या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून याच कालावधीत २५६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

फेरीवाल्यांकडून सव्वादोन लाखांचा दंड वसूल
कल्याण, डोंबिवली शहरांत फेरीवाल्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. महापालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने २७ फेब्रुवारी ते २३ एप्रिल २०२३ कालावधीत विविध कारवाईंत दोन लाख १४ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT