Arrested for stealing jewelery of women passengers
Arrested for stealing jewelery of women passengers esakal
मुंबई

Crime News : महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रात्रीच्या वेळेस एक्स्प्रेसमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांना लक्ष करत पर्स, दागिने चोरणाऱ्या पुणे येथील चौघा सराईत चोरट्यांचा कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. रवी गायकवाड (२८), गणेश राठोड (२३), प्रकाश नागरगोजे (२५) आणि तानाजी शिंदे (२६) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेने त्यांना अटक करत आठ गुन्ह्यांची उकल केली असून चोरट्यांकडून ३ मोबाईल फोन आणि दागिने असा नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अहमदाबाद-पुणे या एक्स्प्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे प्रमाण वाढले होते. एक्स्प्रेमधील प्रवासात झोपलेल्या महिला प्रवाशांजवळील पर्स, सोन्याचे दागिने चोरुन चोरटे पसार होत होते.

कर्जत ते डोंबिवली दरम्यान ही चोरी होत असल्याने कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरशुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक प्रकाश चौगुले, पोलिस हवालदार राजेंद्र दिवटे, जनार्दन पुलेकर, रणजित रासकर, वैभव जाधव, महेंद्र कर्डिले, अजित माने यांच्या पथकाने दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू केला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता रेल्वे फलाटावर चार संशयित व्यक्ती आढळल्या.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रवी याला पुणे येथून अटक केली. पोलिस तपासात त्याने त्याच्या इतर साथीदारांची माहिती दिली. त्याआधारे पोलिसांनी गणेश, प्रकाश आणि तानाजी यांना अटक केली. हे चौघे ही पुणे व औरंगाबाद येथे राहणारे आहेत.

विविध ठिकाणी गुन्ह्यांची नोंद
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी नांदेड, औरंगाबाद, बुलढाणा, भूसावळ या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. रेल्वे फलाटावर एक्सप्रेस थांबल्यावर चोरटे गाडीत चढायचे. तपासणी करुन नंतर चोरी करुन सिग्नलला गाडी थांबताच ते पसार होत होते. कर्जत रेल्वे पोलिस ठाण्यात ६, कल्याण व डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ अशा एकूण ८ गुन्ह्यांची उकल झाली असून ९ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT