मुंबई

मिरा-भाईंदर पालिकेतर्फे ‘अर्थ आठवडा’ साजरा

CD

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नुकताच ‘अर्थ आठवडा’ साजरा केला. हा आठवडा साजरा करताना महापालिका क्षेत्रातील नागरिक सहभागी व्हावेत यासाठी सेल्फी विथ ट्री व किचन गार्डन स्पर्धा तसेच शालेय स्तरावर ऑनलाईन चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात उत्साहाने सहभागी होणारे शालेय विद्यार्थी, रहिवासी सोसायटी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते नुकतेच प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले. मागील काही वर्षांत वातावरणात गंभीर बदल होत असल्याने त्याला अटकाव करण्यासाठी २२ ते २८ एप्रिल यादरम्यान अर्थ आठवडा साजरा करण्यात आला. त्यात २२ रोजी पथनाट्य, २३ रोजी विविध रहिवासी सोसायट्यांमध्ये जनजागृती कार्यशाळा, २४ रोजी अर्थ आठवडा लोगोचे अनावरण व माझी वसुंधरा हरित शपथ, २५ रोजी शहरातील विविध ठिकाणी पथनाट्य तसेच २६ एप्रिल रोजी महानगरपालिका मुख्य कार्यालयापासून ते नगरभवनपर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT