मुंबई

दोन मित्रांमधील वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने वार

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : दोन मित्रांमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यास गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे. या हल्ल्यात संबंधित तरुण सरवर हुल्लेल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे.

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात शुक्रवारी (ता. २८) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फुरकान हा तरुण उभा होता. या वेळी तेथे फैज कर्ते हा फुरकानचा मित्र आला. बघतोस काय, अशी विचारणा करत फैजने फुरकान याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान सरवर हुल्लेल हा त्या ठिकाणी आला. त्याने दोघांच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फुरकान तिथून निघून गेला, पण फैजने सरवर याला अडवत तू मध्ये का पडलास, असे विचारत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फैजने सरवर याच्यावर चाकूने वार करून तेथून पळ काढला. गंभीर जखमी सरवरला उपचारांसाठी कल्याण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात फैज आणि सरवर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT