मुंबई

ठाण्यात रंगणार मुख्यमंत्री चषक टी-२० लीग क्रिकेट स्पर्धा

CD

ठाणे (वार्ताहर) : दादोजी कोंडदेव स्टेडियमवर १ ते ८ मेदरम्यान प्रथमच मुख्यमंत्री चषक टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत खेळले जाणारे ११ वे वर्ष आहे. आयपीएल आणि रणजी करडंक स्पर्धेत खेळलेले क्रिकेटपटू खेळणार असल्याने ठाणेकरांना रंगतदार सामन्याची ही मेजवानी ठरणार असल्याची माहिती महाराष्ट्र माझा सेवा संस्थेचे सल्लागार आणि माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या (ता. १) सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री चषक टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. या स्पर्धेत शशांक सिंग, अखिल हेरवाडकर, रोहन राजे, अंकित चव्हाण, रणजीपटू आशय सरदेसाई, कौस्तुभ पवार, जय बिस्ट, विनायक भोईर, सुजित नायक, धृमिल मटकर, पराग खानापूरकर यांचा समावेश राहणार आहे. स्पर्धेत विजयी संघाला ८८,८८८ रुपये आणि मुख्यमंत्री चषक, उपविजयी संघाला ४४,४४४ रोख आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT