मुंबई

पर्यटक परतीच्या वाटेवर

CD

पर्यटक परतीच्या वाटेवर
महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी सागरी मार्गाचा पर्याय

अलिबाग, ता. १ (बातमीदार) ः तीन दिवसांच्या सलग सुटीनंतर मुंबई-पुण्याकडील पर्यटक सोमवारी परतीच्या प्रवासाला निघाले. काही खासगी वाहनाने, काही सरकारी वाहनाने तर काहींनी जलप्रवासाचा मार्ग अवलंबला. महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेकांनी सागरी मार्गाने जाण्याचा पर्याय स्‍वीकारल्‍याने पीएनपी, अंजठा जेटीवर गर्दी झाली होती.
सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रायगड जिल्ह्याला पसंती दर्शविली. उन्हाचे चटके जाणवत असल्याने पर्यटकांची समुद्र किनारी गर्दी दिसून आली. अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, रेवदंडा, आक्षी, मुरूड, काशीद हे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. समुद्रात पोहण्याबरोबरच स्‍पीडबोट, बनाना बोटीची सफर, घोडागाडी, उंट सवारीचा आनंद पर्यटकांनी घेतला. पर्यटकांच्या गर्दीमुळे हॉटेल, कॉटेजमध्ये हाऊसफुल होते. त्‍यामुळे स्‍थानिकांनाही चांगला रोजगार मिळाला. दोन दिवसांच्या सहलीनंतर सोमवारी दुपारनंतर पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केला.

महामार्गावर पोलिस तैनात
महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्‍याने अनेकांनी मुंबई गाठण्यासाठी सागरी प्रवासाला पसंती दर्शवली. पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच त्यांना निश्चितस्थळी विना व्यत्‍यय वेळेवर पोहचता यावे, यासाठी वाहतूक पोलिसांचा सकाळपासून बंदोबस्त ठेवला होता. मुरूडपासून खारपाडापर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात होते.


सलग तीन दिवसाच्या सुटीनंतर परत जाणाऱ्या पर्यटकांना निश्चित स्थळी पोहचता यावे यासाठी अलिबाग आगाराने पनवेलपर्यंत विनाथांबा बस सेवेवर भर दिला. प्रत्येक १० ते१५ मिनिटाने विनाथांबा सेवा सुरू केली. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जादा बसचीही व्यवस्था केली होती.
अजय वनारसे, आगार व्यवस्थापक, अलिबाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT