मुंबई

फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः विक्रोळी पूर्व येथील कन्नमवारनगरमधील महात्मा जोतिराव फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. म्हाडाचा भूखंड घेण्यास महापालिकेने प्राधिकरणाला तब्बल १३ कोटी ५६ लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पुनर्विकासातील महत्त्वाचा अडथळा दूर होणार आहे. पालिकेच्या आश्वासनानंतर आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या विक्रोळीतील रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.
गेल्या सहा वर्षांपासून या रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला आहे. या रुग्णालयाशेजारीच म्हाडाचा सुमारे ३२ हजार ८२५ चौरस मीटरचा भूखंड आहे. तो एकत्रित करून पुनर्विकासात ५०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. तळघर, तळमजला अधिक १३ मजल्यांची रुग्णालय इमारत असून २१ मजल्यांची डॉक्टर/परिचारिका यांच्यासाठी निवासी इमारत प्रस्तावित आहे.
म्हाडाच्या अखत्यारीत असलेला भूखंड पालिकेला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या बदल्यात म्हाडाने १३ कोटींची मागणी केली आहे. या रकमेचा भरणा केल्यानंतर प्राधिकरणाकडून पालिकेला ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याप्रकरणी कन्नमवारनगरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी १ मेपासून आझाद मैदानात उपोषण सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाची दखल घेत पालिकेतर्फे आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन म्हाडाला पैसे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
.....
‘शुश्रूषा’चा तात्पुरता पर्याय?
रुग्णालयाचा पुनर्विकास पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवाशांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. कन्नमवारनगरमध्ये सध्या बंद असलेले १६० खाटांचे शुश्रूषा रुग्णालय पालिकेने ताब्यात घेण्याची विनंती नागरिकांनी केली आहे. पालिकेने यासाठी एक समिती स्थापन केली आहे. लवकरच याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT