मुंबई

विक्रमगडमधील पाच गावांत बिनविरोध निवडणूक

CD

विक्रमगड, ता. ६ (बातमीदार) : राज्य निवडणूक आयोगाकडून विक्रमगड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींच्या १५ प्रभागांतील १६ जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १८ मे रोजी होणाऱ्या मतदानाआधी ११ ग्रामपंचायतींपैकी पाच गावांमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. आता सहा ग्रामपंचायतींकरिता निवडणुका होत असल्याचे विक्रमगड तहसीलदार कार्यालयाकडून सांगण्यात आले.

तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती असून त्यामध्ये तीन ग्रामदान मंडळांचा समावेश आहे; परंतु अनेकविध ग्रामपंचायतींमधील काही ना काही कारणांमुळे प्रभाग (जागा) रिक्त राहिल्याने त्या भरण्यासंदर्भात ११ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

२७ उमेदवार रिंगणात
सहा ग्रामपंचायतींकरिता २७ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. उपराळे, चिंचघर, वेहेलपाडा, बांधण, कोंडगाव गावातील प्रत्येकी एका प्रभागात पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज असल्याने येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. अन्य गावांतील उमेदवारांचा मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार सुरू झाला आहे. मतदारांची मनधरणी करताना उमेदवार दिसत आहेत.

ग्रामपंचायत जागा उमेदवार
खुडेद १ ३
खडकी ३ ७
सारशी ३ ७
केगवा/बालापूर २ ४
टेटवाली १ २
डोल्हारी बु. १ ३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT