मुंबई

पर्यावरण, स्वच्छतेतून सुंदर शहर

CD

वसई, प्रसाद जोशी
वसई, विरार शहरांत पर्यावरण समतोल, स्वच्छता आणि हिरवळ टिकवून ठेवता यावी, यासाठी महापालिका प्रशासनाने सुंदर शहराचा नारा देत अनेक उपक्रम राबवले आहेत. भविष्यातही अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छंदी वातावरणात मोकळा श्वास घेत पक्ष्यांचा किलबिलाट ऐकता येणार आहे.

शहरातील कचऱ्याचा प्रश्न, तसेच प्रदूषणावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काम करण्यात येत आहे. यासाठी शून्य कचरा मोहीम, हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ व नीटनेटके हिरवळ वनराईने नटलेले शहर म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी स्वच्छ शाळा, रुग्णालय, गृहनिर्माण संस्था, सरकारी कार्यालय व स्वच्छ नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आव्हाने असे उपक्रम हाती घेतले जात आहेत.

वसई, विरार शहराच्या लोकसंख्येला अधिकाधिक सुविधा देता याव्यात, तसेच स्वच्छता, आरोग्य आणि प्रदूषणामुळे होणारी घुसमट दूर करता यावी, यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यामुळे भविष्यात नवे उपक्रम आणि योजना नागरिकांना सुखावणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार, उपायुक्त नयना ससाणे यांनी विविध संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. कचऱ्यापासून खतनिर्मितीला प्राधान्य दिले जात आहे.

समाज प्रबोधनासाठी विविध स्पर्धा
नागरिकांमध्ये जनजागृती व समाज प्रबोधन होण्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता चॅम्पियन, लघु गीत, लघुचित्रपट, चित्रकला, पोस्टर, भित्ती चित्रकला, पथनाट्य, स्पर्धादेखील घेण्यात आल्या असून यापुढेही विविध उपक्रमांतून नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व समाज प्रबोधन होण्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता चॅम्पियन, लघु गीत, लघुचित्रपट, चित्रकला, पोस्टर, भित्ती चित्रकला, पथनाट्य, सर्वोत्तम स्वच्छ हॉटेल, सर्वोत्तम स्वच्छ शाळा, रुग्णालय, गृहनिर्माण संस्था, सरकारी कार्यालय व स्वच्छ नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आव्हाने अशा प्रकारच्या वर्गवारी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे मूल्यांकन व गुणांकन बाह्य परीक्षकांकडून करण्यात आले होते.

विजेत्या स्पर्धकांचा गौरव
स्वच्छ नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, स्वच्छतेवर आधारित लघुगीत, लघुचित्रपट, चित्रकला पोस्टर, पथनाट्य व सर्वोत्तम स्वच्छ गृहनिर्माण संस्था, मोहल्ला स्वच्छता स्पर्धा देखील आयोजित केल्या आहेत. विजेत्या स्पर्धकांना एकूण एक लाख ८८ हजार रुपयांचे धनादेश देऊन गौरवण्यात आले.

शहरातील विविध प्रकल्प
बायोगॅस प्रकल्प
घनकचरा व्यवस्थापन
नऊ प्रभागांत हिरवळ
कचऱ्याच्या ठिकाणी सुशोभीकरण
शहरात ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट
उद्यानांना नवा साज देणार
वीजबचत, वीजनिर्मिती

वसई, विरार शहर हे स्वच्छ, सुंदर असावे, यासाठी विविध उपक्रम, जनजागृती, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. नागरिकांसाठी स्पर्धा देखील घेऊन प्रोत्साहित केले जात आहे. स्वच्छता आणि सौंदर्यीकरणावर प्रशासन भर देत आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त तथा प्रशासक, वसई-विरार महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT