मुंबई

रस्त्यावरील खड्डे भरण्याची प्रतीक्षा

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना - दीड महिना शिल्लक राहिला असूनही शहरातील अनेक रस्ते आजही खड्ड्यात आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि खड्डेभरणीच्या कामास सुरुवात झाली नसल्याने पावसाळ्याच्या तोंडावर ही कामे सुरू करणार का, असा सवाल जागरुक नागरिक करत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर कामे सुरू केली आणि पावसास सुरुवात झाल्यास रस्ते लगेच उखडून त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे खड्डे भरण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. शहरातील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रीटीकरणाचे केले जात असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे; परंतु शहरातील वर्दळीच्या रस्त्यांचा आढावा घेतला हे रस्ते आजही डांबराचे असून त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे; मात्र पुन्हा त्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात पालिका प्रशासनाने खड्डे व चरे भरण्याची नोटीस जाहीर झाली. त्यानंतर १३ तारखेला ठेकेदारांनी ऑनलाईन निविदा पाठविल्या होत्या. अर्धा तासातच हे टेंडर ओपन करत प्रशासनाने ठेकेदारांना कामाचे वाटप करण्यात आले. या प्रक्रियेवर इतर ठेकेदारांनी हरकत घेतली असता प्रशासनाने पुन्हा याची पडताळणी करत ती टेंडर प्रक्रिया रद्द केली. आता पुन्हा नव्याने या कामाची टेंडर प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी किमान आठवड्याभराचा कालावधी लागणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे ही प्रक्रिया पार पडून प्रत्यक्षात काम सुरू होण्यास वेळ लागणार असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
....
टेंडर प्रक्रिया रखडली
पावसाळा सुरू होण्यास अवघा महिना - दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाकडून रस्त्यांची डागडुजी व खड्डे भरण्याचे काम हाती घेण्यात येते; मात्र यंदाच्या वर्षी या कामाची टेंडर प्रक्रियाच अद्याप पार पडलेली नाही.

रस्त्यावर खड्डे आहेत, ही वस्तुस्थिती आहे. रस्तेदुरुस्ती तसेच खड्डे भरण्याची कामे ही गेल्या आठ दिवसांत सुरू होणे अपेक्षित होते; परंतु आलेल्या निविदांविषयी काही तक्रारी प्राप्त झाल्या, त्यात काही त्रुटी आढळून आल्याने त्यामुळे ते टेंडर नव्याने काढण्याचे काम सुरू आहे. यामुळे या कामास विलंब झाला आहे. पुढील आठवड्यात या कामास सुरुवात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- अर्जुन अहिरे, शहर अभियंता, केडीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT