मुंबई

तुंगारेश्‍वरमध्ये माकड, लंगुरांच्या संख्येत वाढ

CD

विरार, ता. ८ (बातमीदार) : तुंगारेश्‍वर अभयारण्यातील पक्षी आणि प्राण्यांची गणना रात्रीच्या वेळी वन विभागाकडून करण्यात आली. या वेळी वाघाचे दर्शन झाले नाही; पण चार बिबटे आणि मोठ्या प्रमाणात माकड, लंगूर आढळून आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

वसई तालुक्यातील तुंगारेश्वर अभयारण्याचा विस्तार हा एकूण ८,५७० हेक्टर क्षेत्रात आहे. पारोळ, सातिवली, मांडवी, रेंज ऑफिसपर्यंत पसरलेला असून या परिसरात विविध पक्षी, प्राणी वावरत असतात. तुंगारेश्वर अभयारण्यात सशांबरोबर हरीण, रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ५ आणि ६ मे रोजी रात्री दोन दिवस करण्यात आलेल्या गणनेमध्ये चार बिबटे, ८२ चितळ, चार भेकर, २४ सांभर, १२ रानडुकरे, ४२ लंगूर, ४४ माकडे, एक मुंगूस, १७ वटवाघुळ, ११ खारी, मगर आणि अजगर प्रत्येकी एक, २४ घुबड, १६ बदक आणि पाणपक्षी, तसेच ११९ इतर पक्षांची नोंद करण्यात आली. याशिवाय घार, तुतारी, कुहुवा, पहाडी अंगारक, शिपाई बुलबुल, कवडे, महाभृंगराज, सुतार, मोर, कोकीळ, मैना यासह विविध पक्षी, प्राणी अभयारण्यात आढळले आहेत.

एकीकडे वसई तालुक्यात सिमेंटचे जंगल वाढत असताना तुंगारेश्वर अभयारण्य विविध वृक्ष, प्राणी, पक्ष्यांनी बहरलेला आहे. वन विभागाकडून वन्यजीव सप्ताह मोहीमदेखील हाती घेत आहे. अभयारण्यासह प्राणी, पक्ष्यांचे जतन करण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT