मुंबई

१४ वर्षांच्या मुलावर सामूहिक लैंगिक अत्याचार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गोरेगाव पूर्व येथे १४ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चौघांविरोधात दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. दिंडोशी पोलिसांनी याप्रकरणी १८ व १९ वर्षांच्या दोन मुलांना अटक केली. तसेच या गुन्ह्यात १५ वर्षे व १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलांचाही समावेश असून त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरणही केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गोरेगाव पूर्व आगार येथील ट्रक स्टॅंडच्या मागे हा प्रकार घडला. पीडित मुलगा २ मे रोजी घटनास्थळी असताना आरोपी मुले तेथे आली. त्यांनी शिवीगाळ करून जबरदस्तीने त्याला तेथील ट्रक स्टॅंडच्या मागे नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर त्याचे चित्रीकरण केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलाने याबाबत प्रथम कोणालाच काही सांगितले नाही. अखेर त्याने दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: एकाच ओव्हरमध्ये चेन्नईला जबरदस्त दुहेरी धक्का! रहाणेपाठोपाठ शिवम दुबे 'गोल्डन डक'वर बाद

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT