मुंबई

गावातील कुल्फी विक्रेतेही झाले हायटेक

CD

जव्हार, ता. ९ (बातमीदार) : सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने थंड पेयांना मोठी मागणी आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुल्फीविक्रेते फिरत आहेत. दुचाकीवरील बंद शीतपेटीतून गारेगार आईसक्रीमची विक्री करून मुलांसह नागरिकांना थंडाईचा आनंद मिळत आहे. मात्र बदलत्या जीवनशैलीनुसार तेही हायटेक झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याचे दिसत आहेत.

सध्या सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने, नागरिक थंड पेयांचा आधार घेत आहेत. उन्हाळा आला की गावोगावी फिरणारे अनेक लालपेटीमध्ये कुल्फी, रंगीत बर्फाचा गोळा घेऊन फिरणारे दिसतात. आता काही हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच विक्रेते तालुक्यात दिसत आहेत. मात्र आता त्यांच्यात बदल झाला असून ते हायटेक झाले आहेत. मोटारसायकलवर व्यवस्थितपणे बांधलेली लालपेटी, दुचाकीच्या हॅन्डेलला यूपीआय क्यूआर कोड दिसत आहेत. ग्रामीण भागातही इंटरनेटचे जाळे पसरल्याने ऑनलाईन आर्थिक व्यवहारांना गती आली आहे. काही विक्रेते आधुनिक पद्धतीने व्यवहार करत असल्याचे पाहायला मिळते.

कुल्फीचे दर पाच आणि दहा रुपये असल्याने सर्वसामान्य ते लहान मुलांपर्यंत परवडणारे आहेत. यापूर्वी गावोगावी फिरणारे विक्रेते हे साधी लालपेटी डोक्यावर घेऊन गावोगावी फिरायचे. गावातील नाक्यावर बसून जोराने आईसफ्रुटवाले अशी हाक द्यायचे. त्यावेळी आईजवळ हट्ट करून आणलेल्या पैशाने लहान मुले बर्फाचा गोळा घेउन जायचे. तो लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असायचा. आता त्यात बदल होऊन मोटरसायकलचा वापर करत आहेत. ते गल्ली-मोहल्ल्यात, घरा-घरांसमोर जाऊन व्यवसाय करत आहेत. बदलत्या काळाप्रमाणे आता सर्वच व्यवसायात बदल दिसून येत आहे. त्यामुळे कुल्फी विक्रेत्यांनीही आपला व्यवसाय हायटेक केला आहे.

आम्ही गावोगावी जाऊन दिवसाला एक ते दीड हजार कुल्फ्यांची विक्री करतो. त्यात एक हजार रुपयांमागे ३०० रुपये मिळतात. दिवसाला खर्च वजा होता ४०० ते ५०० रुपये मिळतात. मात्र त्यासाठी गावोगावी फिरून गर्दीची ठिकाणे शोधावी लागतात.
- कल्पेश चौधरी, आईसक्रीम विक्रेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT