मुंबई

क्लस्टरमधून गावठाण, कोळीवाडे वगळणार

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरातील अनधिकृत व मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘क्लस्टर’मधून गावठाण परिसर, तसेच कोळीवाडे वगळण्यात येणार आहेत. कोळीवाडे, गावठाणे क्लस्टरमधून वगळण्याची मागणी जोर धरत होती. पालिकेची क्लस्टरची अधिसूचना राज्य सरकारच्या राजपत्रातही सोमवारी (ता. ८) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडूनही क्लस्टरवर शिक्कामोर्तब झाले आहे.

मिरा-भाईंदरमध्ये एकंदर १९ गावठाणे आहेत. क्लस्टरची अधिसूचना जाहीर होताच येथील मच्छीमार समाजाकडून त्याला विरोध सुरू झाला होता. या योजनेत कोळीवाड्यांचा समावेश झाला तर मच्छीमार उद्ध्वस्त होतील, त्यामुळे कोळीवाड्यांचा क्लस्टरमध्ये समावेश नको, अशी भूमिका मच्छीमारांनी घेतली होती. त्याचबरोबर गावठाणेदेखील क्लस्टरमधून वगळावीत, अशी मागणी जोर धरू लागली होती. काशी-मिरा भागातील पेणकर पाडा येथील ग्रामस्थांनी समाजमाध्यमांवर ‘क्लस्टर’विरोधात हॅशटॅग मोहीम सुरू केली होती. पेणकरपाडामधील जुन्या गावाचा परिसर वगळा व अन्य भागांत क्लस्टर राबवा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतला होती. या सर्वांची दखल घेत पालिका प्रशासनाने कोळीवाडे व गावठाणांचा क्लस्टरमध्ये समावेश नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाण्याच्या धर्तीवरच क्लस्टर
मिरा-भाईंदरच्या क्लस्टरचे नकाशे ठाणे शहराच्या क्लस्टरच्या धर्तीवरच तयार करण्यात आले आहेत. ठाण्यातील गावठाणे व कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचे सरकारी आदेश जारी करण्यात आले होते. मिरा-भाईंदरमधील क्लस्टरचे नकाशे तयार करताना महसूल विभागाकडून गावठाणे व कोळीवाड्यांची माहिती घेण्यात आली व त्यानुसार नकाशांमध्ये त्यांचे रेखांकन करण्यात आले आहे.

नकाशे लवकरच प्रसिद्ध होणार
मिरा-भाईंदर शहरात २४ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. त्यात अनधिकृत इमारती, चाळी, झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. या संबंधीची अधिसूचना गेल्या आठवड्यात पालिकेने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या राजपत्रातही सोमवारी ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. क्लस्टरचे नकाशे लवकरच महापालिकेच्या कार्यालयात व संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.

क्लस्टरच्या नकाशांमध्ये गावठाणे व कोळीवाडे दिसत असली तरी नकाशांमध्ये गावठाणे व कोळीवाडे यांचे स्वतंत्र रेखांकन करण्यात आले आहे, तो भाग क्लस्टरमध्ये समाविष्ट नाही.
- मारुती गायकवाड, उपायुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT