मुंबई

दोघा भामट्यांनी वृद्धेला लुबाडले

CD

पनवेल, ता. १३ (वार्ताहर) : पनवेलमधील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यालयात धान्य व कपड्यांचे वाटप सुरू असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी एका ७० वर्षीय वृद्ध महिलेजवळचे ५० हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना शुक्रवारी भरदुपारी पनवेलमध्ये घडली. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेत लुबाडल्या गेलेल्या वृद्ध महिलेचे नाव शाबिरा इस्माईल खान असे असून ती पनवेलमध्ये राहण्यास आहे. शाबिरा खान ही शुक्रवारी सकाळी पनवेलमधील उरण नाका येथील आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यालयाजवळून पायी चालत बाजारात जात होती. या वेळी एका भामट्याने तिला अडवून आमदार साहेबांच्या कार्यालयात धान्य व कपड्यांचे वाटप चालू असल्याचे सांगितले. तसेच तिला धान्य व कपडे आणून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या दुसऱ्या भामट्याने तिला तीन वेफरचे पाकीट व २०० रुपये देऊन तुम्ही गरीब दिसले पाहिजे, नाही तर तुम्हाला सामान देणार नाहीत, असे सांगून त्यांना गळ्यातील सोन्याची चेन, अंगठी व पैसे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यातील एका भामट्याने दागिने व्यवस्थित पिशवीमध्ये बांधून त्यांच्या बॅगेत ठेवण्याच्या बहाण्याने आपल्याकडे घेतले. याचवेळी भामट्याने शाबिरा खान हिचे दागिने व रोख रक्कम हातचलाखीने चोरून रिकामी पिशवी त्यांच्या बॅगेत टाकली. त्यानंतर दोघे भामटे त्या ठिकाणावरून पसार झाले. काही वेळानंतर शाबिरा खान हिने बॅगेत ठेवलेली दागिन्यांची पिशवी तपासली असता, त्यात दागिने व रोख रक्कम नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोघा भामट्यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT